Published On : Thu, Oct 11th, 2018

गोवर रूबेला लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यात यावी

Advertisement

नागपूर: गोवर रूबेला लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यात यावी. मोहिमेसाठी अधिका-यांना दिलेल्या जबाबदारीचे तंतोतंत करावे. कामाममध्ये कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही, असे निर्देश प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिले. शनिवारी (ता.६) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत मिझ्झेल्स रूबेला लसीकरणाच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझिझ शेख, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.साजिद खान, डॉ.राठी, डॉ.सुनील धुरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी (लसीकरण) डॉ.सुनील धुरडे, दीपाली नागरे, शिक्षणाधिकारी (माध्यामिक व प्राथमिक) प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेसंदर्भात प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात यावी, अधिका-यांना, कर्मचा-यांना दिलेल्या जबाबदारीचे तंतोतंत पालन करण्यात यावे, असे निर्देश दिले. शाळांच्या मुख्याधापकांचे व केंद्र प्रमुखांचे लसीकरण मोहिमेसंदर्भातील प्रसिक्षण ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात यावे, असेही निर्देश रवींद्र ठाकरे यांनी दिले. सर्व शाळांची माहिती शिक्षणाधिका-यांनी पुढील काही दिवसात प्रशासनाकडे द्यावी, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, एनजीओ यांनी पुढाकार घेऊन महापालिकेला सहाकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

गोवर रूबेला लसीकरण मोहिम नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येत आहे. ही लस महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये ही लस ९ महिन्यांचे बाळ ते १५ वर्षाच्या मुला मुलींना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली. मान्यवरांचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील धुरडे यांनी केले.