Published On : Thu, Oct 11th, 2018

दुर्बल घटक समिती सभापती हरिश दिकोंडवार यांचे पदग्रहण

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या दुर्बल घटक समितीवर सभापती म्हणून नव्याने नियुक्ती करण्यात आलेले नगरसेवक हरिश दिकोंडवार यांनी मावळते सभापती महेंद्र धनविजय यांच्याकडून बुधवारी (ता. १०) पदभार स्वीकारला.

यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपनेते बाल्या बोरकर, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी नवनिर्वाचित सभापती हरिश दिकोंडवार यांनी मावळते सभापती महेंद्र धनविजय यांच्याकडून पदभार स्वीकारला. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. दिकोंडवार यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, दुर्बल घटक समितीचे सभापती म्हणून काम करणे ही उत्कृष्ट काम करून दाखविण्याची संधी आहे. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या समितीअंतर्गत असलेल्या निधीचा सुयोग्य वापर नवनिर्वाचित सदस्यांनी करावा. दुर्बल घटकांचा अभ्यास करून त्यांच्या उत्थानासाठी कार्य करावे, असेही म्हणत त्यांनी मावळते सभापती महेंद्र धनविजय यांच्या कार्याचा गौरव केला.

आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, दुर्बल घटक समितीचे सभापती म्हणून हरिश दिकोंडवार यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचे त्यांनी सोने करावे आणि आपला कार्यकाळ लोकांच्या स्मरणात राहील, असे कार्य करावे, असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. आमदार सुधाकर कोहळे यांनीही काहीतरी नवे, काहीतरी वेगळे करण्याचा सल्ला देत कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे यांनी केले.

आभार मावळते सभापती महेंद्र धनविजय यांनी मानले. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, स्थायी समितीचे माजी सभापती प्रवीण भिसीकर, नगरसेवक सर्वश्री डॉ. रवींद्र भोयर, राजेश घोडपागे, निशांत गांधी, संदीप गवई, जगदीश ग्वालबंशी, शेषराव गोतमारे, राजेंद्र सोनकुसरे, संजय महाजन, अमर बागडे, नगरसेविका मंगला खेकरे, वंदना भगत, जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, निरंजना पाटील, उज्ज्वला शर्मा, अभिरुची राजगिरे, उषा पायलट, रमेश भंडारी, प्रकाश लोणारे, स्लमचे कार्यकारी अभियंता राहाटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.