कन्हान : – निलज येथील जवळपास ५० ते ६० शेतकऱ्यांचा शेती मध्ये जाणारा पांधान रस्ता पाऊसाच्या पाण्या मध्ये व्हाहुन गेल्यामुळे २५० ते ३०० एकर शेतात जाणे येण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शेतीतील पिक पाणी ,जाने येणे, तसेच बैल बंडी, ट्रॅक्टर, खत इत्यादि शेतीत नेने आनने बंद झाले आहे. पाऊसाचा पाण्यामुळे रस्त्यात दहा फुटाचा खडडा पडल्यामुळे शेतात जाने येणे अशक्य झाले आहे. परंतु या समस्ये कडे कोनाही सत्ताधारी आजी-माजी जनप्रतिनिधि ला पाहण्यासाठी सुद्धा वेळ नाही.
नागपुर शहरात नवनवीन मोठमोठे पूल, रस्ते, मेट्रो ट्रेन बनविले जात आहे.परंतु ग्रामीण भागात शेतात जाण्यास साधे रस्ते सुद्धा नाही. ही ग्रामीण क्षेत्राची उपेक्षाच नाही का ? या समस्ये बाबद पारशिवनीचा तहसीलदार सहारे यांना संजय सत्येकार यांचा नेतृत्वात निवेदन देण्यात आले .
यावेळी सचिन चकोले,चंदू पाहुने, धनराज पाहुने,धनराज मेश्राम, प्रकाश इंगळे, हरीदास चकोले, महेंद्र मरसकोल्हे, मिताराम चकोले,रामदास चकोले, देवा चकोले, फूलचंद चकोले, रंगराव चकोले, रामकृष्णा चकोले, पंजाब चकोले, दुर्योधन चकोले,भाऊराव चकोले आदी उपस्थित राहुन हा पांधण रस्ता त्वरित दुरूस्त करून शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी करण्यात आली .