Advertisement
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.
Advertisement