नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे उद्यापासून (दि.3) दोन दिवसांच्या नागपूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. श्री. कोश्यारी यांचे विमानाने रात्री साडेआठ वाजता नागपूरला आगमन होईल. स्थानिक प्रशासनाकडून स्वागताचा स्वीकार करुन ते राजभवन येथे मुक्काम करतील.
राज्यपाल श्री. कोश्यारी हे गुरुवारी (दि.4) सकाळी साडेदहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने आयोजित केलेल्या शताब्दी महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर त्यांचे राजभवन येथे आगमन होईल.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे दुपारी 12 वाजता श्रीमती तनुजा नाफडे लिखित ‘राग-रंजन’ पुस्तकाचे विमोचन करण्यात येईल. त्यानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी हे रात्री आठ वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.