Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 23rd, 2019

  वैविध्यपुर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ठराज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  मुंबई : भारत हा वैविध्यपुर्ण संस्कृतिने नटलेला आहे. विविधराज्यातील आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात वास्तव करत असलेतरी, स्वत:च्या संस्कृतिसोबत त्या प्रदेशाची संस्कृती जपतात आणि विकासात योगदानही देतात. हेच भारताचेवैशिष्ट आहे. विविधतेत एकता जपणा-या देशाचे नागरिक असणे हीसौभाग्यशालीबाब असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.बोरिवली येथील प्रमोद महाजन स्पोर्टस क्लब येथे मुंबई-उत्तराखंड महोत्सवाचेगढवाल भातृ मंडळाने नुकतेच आयोजन केले होते. महोत्सवात राज्यपाल श्री. कोश्यारीबोलत होते.

  राज्यपाल म्हणाले, विविध संस्कृती जपत आपण एकोप्याने राहत आहोत. हेच भारताचेवैशिष्ट्य आहे. आज उत्तराखंडचे स्थानिक नागरिक मुंबईत महोत्सव साजरा करीत आपलीसंस्कृती जपत आहेत. देशात कुठेही वास्तव्यास असणा-या व्यक्तीने आपली मातृभाषा जपलीपाहीजे, ती जगवली पाहीजे. तुम्हाला जगवण्याची आईच्या ममत्वा एवढीच मातृभाषेतहीताकद आहे.

  जगात विविध भाषा, विविध संस्कृती असून एकात्मताअसलेला देश म्हणून आपली ओळख आहे. पुर्वी ग्रामीण भागात प्रवासासाठी वाहन अथवारस्ते नसायचे मात्र आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात शासनाच्या सक्रीय सहभागानेदळणवळणासाठी रस्ते उपलब्ध आहेत. गावांना शहरासाठी जोडून देश एकसंब्ध करण्याचा हाशासनाचा यशस्वी प्रयत्न असून, जगात भारत देश उत्तोरोत्तरप्रगती करीत राहील असे मत राज्यपाल श्री कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केले.महोत्सवाचे आयोजन गढवाल भ्रातृ मंडळ या ९१ वर्षे जुन्या सामाजिक सांस्कृतिक संस्थेने केले आहे. राज्यपालांच्या हस्ते डॉ कुंवरसिंह पंवार यांना गढरत्न पुरस्कार – २०१९ प्रदान करण्यात आला.

  यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे, गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह बिश आदी व्यासपीठावरउपस्थित होते. योवळी सामाजिक योगदान देणा-यांना गढवाल रत्नने सन्मानित करण्यातआले.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145