Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 23rd, 2019

  युवासेने च्या वतीने १० रुपयात शिवथाली भोजन योजनेला नागपूर जिल्ह्यात प्रथमच वाडीला प्रारंभ!

  खा. कृपाल तुमाणे च्या उपस्थितीत उदघाटन सम्पन्न!

  वाडी : विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात गरजू व गोर-गरीब जनतेला कमी दरात भोजन मिळावे म्हणून १० रुपयात शिव थाळी भोजन योजना सत्तेत आल्यावर प्रारंभ करण्याचे अभिवचन दिले होते.आता पक्ष काँग्रेस-राष्रवादी च्या सहकार्याने सत्तेत आला आहे,व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री देखील झाले आहे.सत्ता स्थापणे नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवथाली भोजन योजना राज्यात लवकरच सुरू करण्यात येण्याचे निर्देश देऊन,राज्यात प्रायोगिक तत्वावर लवकरच अशी अन्न आहार केंद्रे प्रारंभ करण्याचे शासनातर्फ जाहीर देखील करण्यात आले आहे.

  मात्र ही शासकीय योजना प्रारंभ होईल याची वाट न पाहता शिवसेनेच्या युवा आघाडीने स्व- प्रयत्न व कल्पनेतून या योजनेला वाडीत मूर्त रूप देऊन रविवारी संध्याकाळी या योजनेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

  नागपूर जिल्हा युवासेना अधिकारी हर्षल काकडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या रयत माऊली अन्नसेवा शिवथाली योजनेचा शुभारंभ रामटेक निर्वाचन क्षेत्राचे खा.कृपाल तुमाणे यांच्या हस्ते,युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे,जिल्हा संघटक संतोष केचे,नगरसेवक राजेश जैस्वाल,प्रा.सुरेंद्र मोरे इ.च्या उपस्थित सम्पन्न झाले.एम.आय.डी.सी. वळणावरील हॉटेल राहूल शेजारी हे अन्न छत्राची व्यवस्था केली असून शासनाच्या मदतीची वाट न बघता युवा सेनेने जनहितार्थ हा उपक्रम प्रारंभ केल्याची माहिती हर्षल काकडे यांनी प्रस्तावनेतून दिली.

  खा.तुमाणे व अन्य अतिथींनी या युवा सेनेच्या संकल्प व पूर्तता योजने चे कौतुक करून, महाआघाडी चे सरकार दिलेली आश्ववासने निश्चित पूर्ण करून खऱ्या अर्थाने प्रजेचे सरकार ठरेल असा विश्वास व्यक्त केला.नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कदाचित वाडी हे प्रथम केंद्र सुरूवात झाल्याची माहिती देऊन,या शिवथाली केंद्रावर १० रुपयात-सकाळी ९ ते रात्री ९ पर्यन्त अन्न वितरण सुविधा देण्यात येईल,शासनाची मदत प्राप्त झाल्यावर ही योजना अधिक सक्षम व दर्जेदार पद्धतींने यशस्वी करू असा आत्मविश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

  कार्यक्रमाला महाआघाडी चे सुरेंद्र मोरे,अखिल पोहनकर,विजय बिवनकर,अविनाश राउत विजय मिश्रा,मीरा परिहार,शत्रूघन परिहार,कपिल भलमे,विलास भोंगळे, प्रफुल भलमे, मोनिका राउत, संदीप उम्रेडकर, संतोष केशरवानी, सचिन बोमबले, दीपक रहांगडाले, मोहित कोठे, पिंटू पोहनकर, रणजीत संसरे, संदीप विधळे, शिवनारायण पवार, विठल राव, अखिलेश सिंग, क्रांति सिंग, राजेश शेळके, लोकेश जगताप, रोहित झा, निशान्त राउत, पशिनेजी, पंकज काउंडनय, रज़ी नायर, सुनील बनकोटि, निखिल डवरे, लक्की नन्नवे, शेरा परमार प्रमोद जाधव, बि.डी.शरणागत,रमेश सातपुते, पंढरीनाथ राउतआकाश इंगोले, सुनील बनकोटि, मोहन पाठक, मंगेश चौरपगार, माहादेव सोंटके, श्यामलाला सकलानी, संतोष गुप्ता, विजय रडके पर्वत सिंग सोलंकी,पुरुषोत्तम गोरे, पप्पू पटले, सुहास सिंगरू इ.मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145