Published On : Thu, Mar 4th, 2021

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.