Published On : Thu, Mar 4th, 2021

महावितरणच्या कृषी ऊर्जा धोरणाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे आवाहन

Advertisement

नागपूर , महावितरणचे कृषी ऊर्जा धोरण शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करणारे असून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. महावितरणच्या महाकृषी ऊर्जा धोरणाच्या प्रसारासाठी काढण्यात आलेल्या कृषी ऊर्जा पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी नव्या कृषी योजनेत नागपूर परिमंडलात आतापर्यंत १२ हजार ५०० शेतकऱ्यांनी १० कोटी रुपयांचा भरणा केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

महावितरणच्या वतीने संपूर्ण राज्यात कृषी ऊर्जा पर्व राबविण्यात येत आहे. यात महाकृषी ऊर्जा धोरणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे. या पर्वाच्या माहिती पुस्तिका आणि पोस्टर्सचे विमोचन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी कृषी धोरणातील महत्वाच्या तरतुदीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे तसेच शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे प्रामुख्याने उपस्थित होते.