| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 19th, 2018

  सरकारची नुकसानभरपाई म्हणजे पुन्हा एकदा जुमलेबाजी – नवाब मलिक

  Nawab Malik

  मुंबई : दि.१९ डिसेंबर – महाराष्ट्रामध्ये एप्रिल- मेमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीठीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाईची मदत फक्त ११ कोटी रुपये जाहीर करण्यात आली असून सरकारची ही घोषणा म्हणजे पुन्हा एकदा जुमलेबाजी असल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

  अवकाळी पाऊस आणि गारपीठमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई जाहीर करा अशी वारंवार मागणी विरोधी पक्षाने केल्यानंतर सरकारने नुकसान भरपाई देतो सांगितले होते परंतु आता नुकसान भरपाईचा जीआर काढण्यात आला आहे त्यामध्ये फक्त ११ कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्हयात एक शेतकरी, वर्धा एक शेतकरी, हिंगोलीमध्ये सहा शेतकरी आणि काही जिल्हयात दहा शेतकरी म्हणजे यांची मदत जाहीर करण्याची घोषणा ही जुमलेबाजी आहे हे यावरुन दिसून आले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

  हे भाजप सरकार ३८ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर करते परंतु १८ हजाराचेही वाटप होत नाही. नुकसान भरपाई जाहीर करते ते पैसे लोकांना मिळत नाही. दुष्काळ असताना कोणतीही उपाययोजना होत नाही. म्हणजे हे सरकार जुमलेबाज आणि शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट होते असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145