Published On : Fri, Mar 23rd, 2018

उत्तर नागपूरातून निघणार भव्य शोभायात्रा


नागपुर: प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी ही उत्तर नागपूरातून चैत्र नवरात्र व रामनवमी निमित्त प्राचीन शिवमंदिर बेलिशाप-मोतीबाग रेलवे कालनी मधून २५ मार्च ला सायंकाळी ४.०० वाजता रामजन्मोत्सव शोभायात्रा निघेल. शोभायात्राच्या आयोजकांनी सांगितले की शोभायात्रेचे आयोजन श्री शिवमंदिर ट्रस्ट व शोभायात्रा कमेटी द्वारे करण्यात आले आहे. या दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रम होतील. यात शुक्रवार २५ मार्च रोजी अष्टमी-नवमी असल्यामुळे सकाळी ७ वाजता महाअष्टमी हवन, १० वाजता सामुहिक सुन्दरकांड पाठ १२ वाजता रामजन्म उत्सव त्यानंतर कन्यापूजन व प्रसाद वितरण, त्याच दिवशी सायंकाळी ४.०० वाजता मंदिर परिसरातून भव्य शोभायात्रा निघेल. शोभायात्रेमध्ये प्रमुख अतिथि प्रमुख अतिथि उत्तर नागपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद माने, मनपा स्थायी समिति अध्यक्ष विक्की कुकरेजा, राज्याचे पूर्व जलसंसाधन मंत्री डॉ. नितिन राऊत, होमियोपैथी चे प्रसिद्ध चिकित्सक व नरकेसरी प्रकाशन के अध्यक्ष डॉ विलास डांगरे, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. उदय बोधनकर, नगरसेवक संदीप सहारे, जी.एन.आय. संस्था के मैनेजिंग डायरेक्टर नवनीतसिंग तुली, दीपक एंजसी व जीरो माइल फाउंडेशन के कार्याध्यक्ष दीपक लालवाणी, पूर्वनगरसेवक बब्बी बावा, विरेन्द्र झा, डॉ. प्रवीण डबली प्रमुख्याने उपस्थित राहतील हे शोभायात्रेचे १६ वें वर्ष आहे.

शोभायात्रा संबंधी विस्तृत माहिती देताना शिवमंदिर ट्रस्टचे सदस्य विरेंद्र झा व डॉ प्रवीण डबली यांनी सांगितले कि उत्तर नागपूरात या प्रकारचे आयोजन मागील कित्येक वर्षा पासून होत आहे. आता पर्यंत मध्य नागपूर व पश्‍चिम नागपूरात शोभायात्रा निघायची. मागील १६ वर्षापासून उत्तर नागपूरात निघणार्‍या शोभायात्राचे स्वरूप मोठे आहे. अनेक संघटना यांत सहभागी होत आहे. शोभायात्रेत कन्या व सखी डोक्यावर कलश घेऊन राहतील, त्यात बाल पुरोहित पताका घेऊन शोभायात्रेच्या समोर चालतील, श्री राम जानकी दरबार ङ्गुलांनी सुसज्जीत रथावर विराजमान राहतील, लहान मुली बैंड व्या तालावर गरबा करत चालतील. शोभायात्रेत अनेक संघटनांनी रामायणातील देखावा सादर केलेल्या झाक्या सादर करणार आहे. शोभायात्रेत जीवंत देखावा लोकांचे लक्ष वेधून घेतो. यात सजीव देखावे ठेवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. शिवमंदिर रामायण मंडळाद्वारे रामायणातील सजीव प्रसंगाचा देखावा निर्माण केला आहे. त्याच प्रमाणे विभिन्न भजन मंडळ यात सहभागी होणार आहे.

महिला मंडळाद्वारे पूर्ण मार्ग रंगीत रांगोळ्यांनी सजवणार आहे. त्याच बरोबर शोभायात्रेत प्रसाद वितरणाची पण व्यवस्था आहे. पूर्ण मार्ग तोरणांनी सजविण्यात आला आहे. नवयुवक मंडळा तर्ङ्गे विविध ठिकाणी प्रसाद, चाय कॉङ्गी, ङ्गळ व ताकाची नि:शुल्क व्यवस्था केली आहे. या उत्सवात सहभागी होऊन पुण्य प्रसाद प्राप्त करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या आधी ३१० वर्ष प्राचीन श्री शिवमंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले. विविध महिला मंडळानी आपल्या भजनांनी आपली उपस्थिति लावली, आंध्र महिला मंडळाद्वारे ललिताशास्त्रम्, नित्य जसगायन करण्यात आले. सोमवार २६ मार्च ला सकाळी ९.३० वाजता घटविसर्जन, १० ते १ वाजे पर्यत मनोकामना अंखड ज्योत विसर्जन करण्यात यईल. याच दिवशी सायं ६.३० वाजता राम-जानकी विवाह निमित्त नाग मंदिर बेलीशाप मधून श्री रामाच्या मूर्ति समेत वरात काढण्यात येईल व ७ वाजता मंदिर परिसरात राम -जानकी विवाह संपन्न होईल. त्यानंतर भगवान श्रीरामाचा राज्याभिषेक करण्यात येईल व त्या नतंर महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या सफलतार्थ विरेन्द्र झा, डॉ प्रवीण डबली, पी.सत्याराव, प. कृष्णमुरली पांडे, एड. राजेश सहगल, भुवनलाल यादव, पं. राजेश द्विवेदी, अरविंदसिंग तोमर, पी. विजयकुमार, प्रकाशराव (गुन्डु), अशोक पटनायक, बलराम प्रसाद, गुरूवचनसिंग दीपांकर पाल, पी. हरिदास, रमाटिचर, पी. कन्याकुमारी, शशी यादव, पुष्पा नागोत्रा, उमेश चौकसे, तोलानी सहित अनेक श्रद्धालु व महिला मंडळ अथक प्रयत्न करित आहे.