| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 19th, 2019

  ….जेव्हा गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे आग लागते तेव्हा …

  OCW ने घेतली गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा Mock ड्रिल

  NAGPUR: वेळ सकाळी ११ वाजता ची, गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात नेहमीची केंद्र कर्मचाऱ्यांची लगबग चाललेली. पंपिंग, volve operations पाणी नमुने तपासणी, Electrical चमूDescription: Description: Description: C:\Users\Sachin Dravekar\AppData\Local\Microsoft\Windows\Temporary Internet Files\Content.Outlook\VCHROZ97\IMG_20190918_110527 (2).jpg विद्युअत पुरवठा panel वर तपासणी मध्ये व्यस्त, तर Maintenance देखभाल चमू देखभालीच्या कामात व्यस्त, सुरक्षा आणि आरोग्य चमू आप -आपल्या कामात व्यस्त. अशातच अकस्मात सायरन (धोक्याची घंटी) वाजायला सुरुवात होते.

  कर्मचारी बघतात तर काय ऐका अत्यंत महत्वाच्या विद्युत संच मधून धूर निघताना दिसतोय आणि पंपिंग बंद पडले. धुराचे रुपांतर लवकरच आगीच्या ज्वाला मध्ये झाले.

  पण तितक्यात सायरन वाजल्याबरोबर, जलशुद्धीकरण केंद्रात कार्यरत असलेले निष्णात असे ४ फायर fighter ची चमू क्षणार्धात विद्युत panel जवळ पोहोचली आणि जवळपास १ मी. १६ सेकंद च्या सक्रीय प्रयत्नांत नजीकच उपलब्ध असलेले फायर विझाविणारे सयंत्र वापरून 45 sec. मधेच पूर्णपणे आग आटोक्यात आणण्यात आणि पुन्हा त्यायोगे संपूर्ण चाचपणी केल्यानंर्तर व्यवस्थितपणे पंपिंग अर्थात पाणीपुरवठा पण सुरु झाला ( 1.Min 16 Sec).

  हे सर्व घडले आज अचानक OCW ने घेतलेल्या सुरक्षा Mock ड्रिल दरम्यान. OCW साधारणपणे वर्षभरात अश्या ४ MOCK ड्रिल सर्व जलशुद्धीकरण केंद्रामध्ये घेत असते ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा किती सक्रीय आहे ह्याचा आढावा घेता येतो.

  जर जलशुद्धीकरण केंद्रात काही दुर्घटना घडल्यास पंपिंग बंद पडू शकते आणि शहराचा पाणीपुरवठा देखील विस्कळीत/खंडित होऊ शकतो. हे सर्व होऊ नये म्हणून OCW ची सुरक्षा यंत्रणा नेहमीच सज्ज असते अश्या प्रकारच्या कुठल्याही घटने करिता.

  गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात ४ निष्णात असे फायर fighter, तसेच जवळपास ४४ फायर विझाविणारे सयंत्र अत्यंत मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे.

  गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात जवळपास ५० कामगारानि आज वरिष्ठ सुरक्षा प्रबंधक अमित गेडाम आणि गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्रात मुख्य प्रबंधक प्रवेन शरण, प्रबंधक दिलीप ठाकरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या चाचपनी मध्ये सक्रीय भाग घेतला.

  ocw ने September १६ ते २१ पर्यंत सर्व जल शुद्धीकरण केंद्र तसेच झोन कार्यालय आणि प्रोजेक्ट कामकाज क्षेत्रात “सुरक्षा आणि आरोग्य आठवडा ह्यांचे आयोजन केले आहे.

  Sept १६, २०१९ ला झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात OCW चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजोय रोय ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी आणि कामगार कर्मचार्यांना सुरक्षा शपथ देण्यात आली. ह्याप्रसंगी संचालक (O&M) राजेश कालरा, राज्जीत आय्याथान, मुख्य प्रबंधक प्रवीण शरण, सुरक्षा प्रबंधक अमित गेडाम तसेच सर्वे १० झोन चे झोन प्रबंधक, प्रोजेक्ट प्रबंधक आणि जल शुद्द्धीकरण केंद्र प्रबंधक प्रामुख्याने उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145