Advertisement
नागपूर: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यकारी महापौर दिपराज पार्डीकर यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालय स्थित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नागपूर नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले.
यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, अपर आयुक्त रविंद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अभीयंता प्रफुल्ल फरकासे, सुधीर कोठे, राजू भांडारकर, बारई, वांदीले यांच्यासह बहुसंख्य म.न.पा. अधीकारी/कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.