Published On : Tue, Sep 1st, 2020

छावणी परिषद प्रशासना विरोधात गोराबाजार वासीयांनी धरले प्रशासनाला वेठीस

Advertisement

कामठी:- सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामठी छावणी परिषद परिसरात पसरले असता या कोरोनाचा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठो कामठी छावणी परिषद प्रशासनाच्या वतीने मागील चार महिन्यापासून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून या छावणी परोषद अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या गोराबाजार सारख्या परिसरातील नागरिकांना या छावणी परिषद प्रतिबंधित क्षेत्रातून कामठी शहरात ये जा करण्यास मज्जाव करीत आठवड्यातून फक्त एकच दिवस परवानगी देण्यात आली होती तर हा मानसिक त्रास मागील चार महिन्यापासून सहन करोत असल्याने सर्व नागरिकांची डोकेदुखी ठरली होती त्यातच 29 ऑगस्ट ला झालेल्या मुसळधार पावसात गोराबाजार वासी तसेच जुनी कामठी परिसरातील नागरिकांचे पुरबाधित स्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यातच जीवनावश्यक वस्तुसह पाळीव जनावरे सुद्धा वाहून गेल्याने नागरिकावर मोठे आर्थिक संकट आले होते

अशा परिस्थितीत उपजीविकेसाठी लागणारे जीवनावश्यक वस्तू साठी कामठी शहरात जाण्याशिवाय पर्याय नाही मात्र या छावणी परिषद प्रशासन तसेच सैन्य प्रशासन च्या एकाधिकार शाही वृत्तीमुळे नागरिकांना शहरात जाण्यास मज्जाव करीत असल्याने या गोराबाजार वासी तसेच जुनी कामठी वासीयांचा संयम तुटला आणि आज सकाळी 8 वाजेपासून छावणी परिषद प्रशासन विरोधात समस्त गोराबाजार वासी तसेच जुनी कामठी वासीयांनी गरुड चैकात ठिय्या मांडून नागपूर जबलपूर मार्ग बंद करून रस्त्यावरच ठिय्या मांडून बसत सैन्य प्रशासन विरोधात नारेबाजी करण्यात आले. तसेच छावणी परिषद प्रशासनाला वेठीस धरण्यात आले

दरम्यान निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित तहसिलदार अरविंद हिंगे, डीसीपी निलोत्पल, एसीपी मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल व पोलीस पथक गरुड चौकात पोहोचून परिस्थितीती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच नागरिकांची समजूत काढण्यासाठी खुद्द आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जैस्वाल , माजी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर , जी प चे विरोधी गट नेता अनिल निधान आदींनी भेट देत नागरिक व प्रशासनिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणून नागरिकांची समजूत काढण्यात आली यानुसार पुढील चार दिवसापर्यंत चार ही गेट उघडण्यात येणार असल्याचे हस्तलिखित माहिती छावणी परिषद सी ओ अभिजित सानप यांनी तहसिलदार अरविंद हिंगे यांना दिल्यावरून नागरिकांनी समाधान प्राप्त करीत प्रशासना विरोधातील रोष कमी करण्यात आला तसेच पुढील तीन दिवसात ब्रिगेडियर च्या मुख्य उपस्थितीत व लोकप्रतिनिधी च्या मुख्य उपस्थितीत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याची माहिती देण्यात आली.

संदीप कांबळे कामठी