Published On : Sat, Sep 2nd, 2017

तुरक बाबुच्या सेवानिवृती सत्कारासह निरोप

कन्हान : आदर्श हायस्कूल कन्हान चे कनिष्ठ लिपिक महमुदुल हसन एच. तुरक (बाबु) हयानी आदर्श हायस्कूल कन्हान येथे उत्तम सेवा दिल्याबद्दल संस्था व शिक्षक कर्मचा-याच्या वतीने निरोप समारंभासह सत्कार करून निरोप देण्यात आला.

नुकताच आदर्श हायस्कूल कन्हान येथे हा संस्थेचे सचिव श्री बी. एस. साळवे हयाच्या अध्यक्षेत व संस्था अध्यक्षा सौ. पुष्पा आर. व्दिवेदी, मुख्याध्यापक श्री ए. आर. काव़ळे, माजी मुख्याध्यापक श्री आर. व्ही. गोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत हायस्कूलचे कनिष्ठ लिपिक महमुदुल हसन एच. तुरक हयानी उत्तम सेवा प्रदान केल्याबद्दल त्याच्या सेवा निवृत्ती निरोप संमारंभासह शाल श्री़फळ देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचाालन योगेशकुमार पांडे सर हयानी तर आभार प्रदर्शन सुरेश वंजारी हयानी मानले. याप्रसंगी हायस्कूलचे सौ. मसाळकर, सौ. सी. एन. मेश्राम, सौ. गेहाणी, सर्वश्री गोंडाणे, चापरे, सोलंकी, डोंगरे, नंदनवार, यादव, पेटकर, चा़फले, मेश्राम, खान, सोमकुवर, आयडियल कॉन्व्हेंट हिंदी शाळेतील शिक्षक व हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी श्री मानकर, सुरेश वंजारी, सौ हारगुडे, नेवारे, दुबे हयानी उपस्थितीत राहुन कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिश्रम घेतले.