Published On : Tue, Jun 15th, 2021

बुटीबोरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद

Advertisement

नागपूर – कोरोना प्रतिबंधातमक लसीकरणासाठी महावितरणच्या बुटीबोरी विभागात आयोजित लसीकरण मोहिमेला कर्मचाऱ्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत बाह्यस्त्रोत,सुरक्षा रक्षक आणि नियमित कर्मचारी अशा एकूण ६०एवढ्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लास लस मिळावी यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.त्याअंतर्गत बुटीबोरी विभागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नागपूर परिक्षेत्राचे संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. तसेच सर्वच कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे आणि इतर सहकाऱ्यांनाही प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

बोरखडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.कडू आणि डॉ.फटिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी लसीकरण केले. नागपूर शहर परिमंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे व सहकाऱ्यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.