Published On : Fri, Jun 19th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बळीराजासाठी आनंदवार्ता;राज्यात 21 जूननंतर अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

Advertisement

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावल्याने चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळत आहेत. पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचे वातावरण तयार होत असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून राज्यभर सक्रिय होण्याची शक्यता आहे.

हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार, 21 जूनपासून राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. सुरुवातीला विदर्भात पावसाची हजेरी लागेल, त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. 21 ते 30 जूनदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पावसामुळे कोरडे पडलेले शेतमळे ओलावतील, तर धरणे, तलाव आणि नदी-नाल्यांमधील पाणीसाठ्यातही वाढ होण्याची अपेक्षा आहे. पावसाअभावी रखडलेल्या खरीप हंगामाला यामुळे नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र आहे.

पेरणीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन-
शेतकऱ्यांनी केवळ पावसाच्या अंदाजावर पेरणी न करता शेतातील ओलाव्याची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा. जमिनीत पुरेशी आर्द्रता निर्माण झाल्यानंतरच पेरणी केल्यास पीक उगवण चांगली होईल आणि दुबार पेरणीचा धोका टळेल.

Advertisement

दरम्यान, यंदाचा मान्सून समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात राज्यातील बहुतांश भागांना चांगल्या पावसाचा लाभ मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Advertisement
एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News

मुंबई आंदोलन पर जरांगे पाटील का बड़ा ऐलान.. #Jarange #MarathaReservation #MumbaiProtest #News

Ratnagiri: लोटे MIDC की बदहाल सड़कों पर पहुंचे Aaditya Thackeray  #MaharashtraNews

Ratnagiri: लोटे MIDC की बदहाल सड़कों पर पहुंचे Aaditya Thackeray #MaharashtraNews

Mohan Bhagwat के America दौरे पर Sanjay Raut का बड़ा बयान! #SanjayRaut #MohanBhagwat #RSS #Political

Mohan Bhagwat के America दौरे पर Sanjay Raut का बड़ा बयान! #SanjayRaut...

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges