गोंडेगाव खदान सुरक्षारक्षाकांनी टालचा एक ट्रक कोळशा पकडला
कन्हान: वेकोलि गोंडेगाव खुली खदान माती डम्पिंग जवळ वेकोलि दिवसपाळी सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी कारवाई करून परिसरात सुरू असलेल्या अवैध कोळशा टाल वर धाड टाकुन एक ट्रक कोळशा पकडुन जप्त केला.
प्राप्त माहीती नुसार मंगळवार (दि २१) मे ला दुपारी ३.३० वाजता दरम्यान वेकोली गोंडेगाव खुली खदान दिवस पाळी सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश पाल व सुरक्षारक्षकांनी गोंडेगाव खुली खदान माती डम्पिंग जवळच असलेल्या भुजंग महल्ले च्या अवैध कोळशा टालवर धाड टाकुन एक ट्रक कोळसा म्हणजे अंदाजे २० टन किंमत ४० हजार रुपयांचा पकडुन कोळशा डम्पिंग यार्ड मघ्ये जमा करण्यात आला. असुन परत इथे कोळशा टाल चालवायचा नाही अशी ताकीद देण्यात आली आहे.
वेकोलि सुरक्षा अधिकारी व पोलीस प्रशासना व्दारे कोळशा चोरी वर कडक कारवाई करण्यात येत नसल्याने कोळसा माफिया सक्रिय होऊन जोमाने टालला सुरवात करण्यात अाल्याने अवैध कोळशा चोरी व टालला सुगीचे दिवस आले आहे. कन्हान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याने पाणी कुठेतरी मुरत असल्याचे लोकांच्या उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.
– मोतीराम राहाटे,कन्हान