Published On : Tue, May 18th, 2021

गोंडेगाव, घाटरोहना शिवारात कोळसा चोरीचा ट्रक सह आरोपीस पकडले

– उपविभागीय पोलीस अधिकारी ची कारवाई नऊ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि खुली कोळसा खदान च्या गोंडेगाव, घाटरोहना शिवारात उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा पेट्रोलिंग करित असता दरम्यान गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीसांनी धाड मारून खुली खदानचा चोरी केलेला कोळसा ट्रक मध्ये भरून नेताना ट्रक पकडुन आरोपी चालकाच्या ताब्यातील ट्रक व २० टन कोळसा सह नऊ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करित दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.१७) मे २०२१ ला दुपारी १:३० ते २ वाजता दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान साहेब हे आपल्या वाहन चालक शिपाई सह जिल्हा गस्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमी मिळाल्याने गोंडेगाव, घाटरो हना शिवारात एक ट्रक क्र एम पी ०९ एच एच ६५२१ मध्ये वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा भरून घेऊन जात आहे.

पोलीसांनी घटनास्थळी सरकारी वाहनाने जावुन धाड मारली अस ता कोळसा भरणारे मजुर पळुन गेले. ट्रक चालकास पकडुन विचारपुस केली असता उमेश पानतावने यांचे सांगण्यावरून ट्रक भरून घेऊन जात आहे. ट्रक चाल काकडे कोणत्याही प्रकारची बिल्टी व गेट पास नस ल्याने सदर कोळला हा चोरीचा असल्याचे निष्पन झाल्याने एक ट्रक क्र एम पी ०९ एच एच ६५२१ किं. आठ लाख रू व दगडी कोळसा २० टन किंमत एक लाख रू असा एकुण नऊ लाख रूपयाता मुद्देमाल ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला आणुन सर कारी फिर्यादी पोशि विक्की उमेश कोथरे पोस्टे खापर खेडा यांचे तक्रारीने आरोपी
१) ट्रक चालक मुकेश कुमार छित्तरमल मेवाड वय ३७ वर्ष रा. शाजापुर मध्य प्रदेश,
२) उमेश मारोती पानतावने वय ४६ वर्ष रा. कांद्री कन्हान यांचे विरूध्द अप क्र १४१/२०२१ कल म ३७९, १०८ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून ट्रक व कोळसा असा एकुण नऊ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कन्हान मा. मुख्तार बागनान यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी, कन्हान पोस्टे गुन्हे शाखा निरीक्षक श्री कदम, सफौ येशु जोसेफ, नापोशि कृणा ल पारधी, राजेंन्द्र गौतम, राहुल रंगारी, संदीप गेडाम, पोशि संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशिल तट्टे, विक्की कोथरे आदीने शिताफितीने सापळा रचुन यशस्विरित्या पार पाडली.