Published On : Tue, May 18th, 2021

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय कृती दल गठीत

भंडारा: कोरोना या माहामारीमुळे आई वडील दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकाच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. अशा बालकाच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (टास्क फोर्स) तयार करण्यात आले आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत पोलीस अधिक्षक वसंत जाधव, सचिव विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, पोलीस निरीक्ष‍क डी. डी. बन्सोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निलम बाबर, श्रीमती माया उके, अध्यक्ष महिला बाल कल्याण समिती, महिला बाल विकास विभागातील परीविक्षा अधिकारी अरुण बांदुरकर, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) नितीनकुमार साठवणे व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी उपस्थित होते.

कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी याकरीता जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयामध्ये मदतीकरीता चाईल्ड हेल्प लाईन 1098 संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले.