Published On : Tue, Jan 21st, 2020

गोंडेगाव व नांदगाव ला पल्स पोलियो संपन्न

ग्राम पंचायत गोंडेगाव

कन्हान : – ग्राम पंचायत गोंडेगाव येथे पल्स पोलियो अभियानाची सुरूवात सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरीमारे यांच्या हस्ते छोटया मुलांना पोलिओ डोज पाजुन करण्यात आली. या प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य सुनील धुरिया, कुणाल मधुमटके,आकाश कोडवते, अंगणवाडी सेविका इंदू राऊत, छाया राऊत, अर्चना पाटील, आशावर्कर आम्रपाली पाटील, निर्मला पवार उपस्थित होते. मुलाना चॉकलेट वितरित करण्यात आले.

ग्राम पंचायत नांदगाव
नांदगाव ग्राम पंचायत येथे उपसरपंच सेवक ठाकरे यांच्या हस्ते आशिष रच्छोरे यांच्या छोटया मुुलाला पोलिओ डोज पाजुन पल्स पोलियो अभियानाची सुरूवात करण्यात आली . या प्रसंगी आंगनवाड़ी सेविका रेखा भोतमांगे, आशा वर्कर रेखा पु-हे, मनोज वरखडे, आकाश रच्छोरे, अतुल रच्छोरे , शंभाजी बांगडे, तुषार ठाकरे, निलेश गिरी, राजु धानोले, रवि रच्छोरे, चेतन उके, भोला, धिरज, रामेश्वर, हिरु, आशीष भाऊ आदि प्रामुख्याने उपस्थित होते.