Published On : Tue, Jan 21st, 2020

नेहरू युवा केंद्र व्दारे कन्हान ते टेकाडी सायकल दौड

कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपूर व्दारे भारत सरकारच्या फिट इंडिया कॅम्पेन अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील कांद्री कन्हान येथील धर्मराज विद्यालया सामो रून टेकाडी बस स्टॉप पर्यंत सायकल दौडचे आयोजन करण्यात आले होते.

जे एन राष्ट्रीय चारपदरी महामार्गाव रील धर्मराज विद्यालय सामोर सायकल दौड स्पर्धकाना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक उदयवीर सिंह, धर्मराज विद्यालयाच्या मुख्याध्यापीका प्रमिता वासनिक, कांद्रीचे ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे, समाजसेवक लीलाधर बर्वे, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष कपिल आदमाने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन सायकल दौड ची सुरूवात केली. या कार्यक्रमात शंभर पेक्षा अधिक युवकांनी सहभाग घेतला. यात धर्मराज विद्यालय व नूतन सरस्वती विद्यालयाती ल तसेच परिसरातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.

या कार्य क्रमाच्या यशस्वितेसाठी युवा चेतना मंच, धर्मराज विद्यालय, ग्रामपंचायत कांद्री यांनी विशेष सहकार्य केले. आयोजनार्थ नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक श्याम मस्के, कमलेश गजभिये, युवा चेतना मंच तालुकाध्यक्ष विनोद कोहळे, शिक्षक सुनील लाडेकर, भस्मे, हरीश केवटे, सारवे, मंगर, युवा चेतना मंचचे सदस्य अश्विन कुंभलकर, आदित्य बावनकुळे, स्वप्निल चिखले, अनिकेत देशमुख, वीर सिंग, शुखासु मेहरकुळे, बालू वैद्य, मेश्राम बाबु, पंकज मस्के, सकेत चकोले सह युवकांनी सहकार्य केले.