राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभागात एम,एड परीक्षेत विद्यापीठातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल आसिया सय्यद यांना तीन सुवर्ण पदक व एक बक्षीस प्राप्त झाले.
नुकताच पार पडलेल्या 110 व्या दीक्षांत समारंभात आसिया सय्यद यांना स्वर्गीय सर्वपल्ली राधाकृष्णन सुवर्णपदक,भारतरत्न मदर तेरेसा पदक,डॉ वेद प्रकाश मिश्रा सुवर्णपदक, डॉ गौरीशंकर पाराशर सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ टी जी सिताराम,विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्र कुलगुरू डॉ संजय दुधे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून आसिया यांनी यशाचे श्रेय आई,वडील,विभाग प्रमुख डॉ राजश्री वैष्णव,डॉ अर्चना नेरकर, डॉ रेणू बायस्कर,डॉ अर्चना ठाकरे डॉ तिक्षा शामकुल यांना दिले आहे.