Published On : Mon, Oct 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सोन्याच्या भावात मोठी घसरण; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर कोसळले,ग्राहकांना दिलासा!

Advertisement

सोन्याच्या भावात मोठी घसरण; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दर कोसळले,ग्राहकांना दिलासा!

नागपूर : सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. २६ ऑक्टोबर रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव खाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किमतीत मोठी घट नोंदवण्यात आली होती.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १.४२ लाखांवर-

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ४२ हजार ७२० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३० हजार ८४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ४२ हजार ५७० रुपये, तर २२ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ३० हजार ६९० रुपये प्रति १० ग्रॅम दर नोंदवण्यात आला आहे.

आठवडाभरात हजारोंची घसरण-

Advertisement

सोन्याच्या दरातील घसरणीचा परिणाम गेल्या आठवड्यातही दिसून आला. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५ हजार ८० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४ हजार ६५० रुपयांनी कमी झाला. त्यातच आता आठवड्याच्या सुरुवातीलाच दर उतरल्याने सोने खरेदी करणाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.

चांदीही स्वस्त; खरेदीदारांचे बाजाराकडे लक्ष-

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे समोर आले आहे. सणासुदीच्या काळात मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. मात्र, सोन्या-चांदीचे दर शहरानुसार आणि विक्रेत्यानुसार बदलू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील ताजे दर तपासणे आवश्यक आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.