Published On : Sat, May 9th, 2020

सिम्बॉयसिस कोरेनटाईन केंद्राचा बाजूलाच नागपूरातील बकरा मंडी आजपासून सुरू

Advertisement

– बकरा मंडीला स्थानिकांचा तीव्र विरोध, लॉक डाऊन तोडून नागरिकांचा विरोध

नागपुर-नागपुरातील वाठोडा परिसरातील सिंबोयसिस विद्यापीठ येथे तब्बल 600 च्या वर कोरोना संशयितांना ठेवल्या गेले आहे । त्यामुळे आधीच दहशतीत असलेल्या नागरिकांना मनपा च्या हुक़ूमशाही निर्णयाने धक्का बसला आहे । चक्क कोरेनटाईन सेंटर च्या बाजुलाच नागपुरातील सर्वात मोठी मोमिनपुरातील बकरा मंडी येथे आज पासून सुरु करण्यात आल्याने परिसरात एकच रोष निर्माण झाला आहे । त्यामुळे या बकरा मंडीला विरोध करण्यासाठी आज शेकडो लोक लॉकडाउन नियम तोडून रस्त्यावर आल्याने वाठोडा पोलिस आणि प्रशासनाला सर्व काम बाजूला सोडून घटनास्थळावर धाव घ्यावी लागली ।

येथे काही काळ तणावाची परिस्थिति निर्माण झाली होती । बकरा मंडी ला सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांच्या विरोध असल्याने वाठोडा, चैतनेश्वर नगर, राधाकृष्ण नगर, तरोडी,बिडगाव ची जनता एकत्र आली आणि बकरा मंडीला विरोध करण्यात आला ।या प्रकाराची माहिती होताच स्वामींनारायन मंदिराशी जडलेले जैन समाजाचे प्रतिनिधिही तेथे पोहचले आणि त्यांनीही तीव्र विरोध केला । यावेळी तणाव वाढत असल्याने नेहरू नगर च्या सहायक आयुक्त स्नेहा करपे, वाठोडा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर पोहचले ।

लॉक डाऊन च्या नियमाची कडक अंमलबजावणी आणि सिम्बॉयसिस कोरेनटाईन सेंटर व्यवस्थित सुरू ठेवण्याचे लक्ष्य समोर ठेवीत सहायक आयुक्त स्नेहा करपे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांनी मध्यस्थी करीत लोकांना शांत करून तणावाची परिस्थिती निवळली ..विशेष म्हणजे बाजूलाच असलेल्या हिवरीनगर येथील भाजप नगरसेविका कांता रारोकर यांचे परिवारातील तसेच भाजप युवा मोर्चा चे कार्यकर्ते बाल्या रारोकर हे मटण चा व्यवसाय करतात आणि त्यामुळे नागरसेविकांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मदतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना मोमीनपुरा हॉटस्पॉट चे कारण देत मोमीनपुरातील बकरा मंडी वाठोडा ला लॉक डाऊन च्या कालावधीकरिता स्थानांतरित करण्याची मागणी केली होती ।

या मागणी नुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आदेश काढीत वाठोडा येथे बकरा मंडीला सुरू करण्याची परवानगी दिली । परंतु येथील शेकडो नागरिकांनी पहिल्याच दिवशी तीव्र विरोध केल्याने आणि येत्या मंगळवारी भरणारी बकरा मंडी हाणून पाडू असा इशारा नागरिकांनी दिला आहे । बकरा मंडी मुळे पूर्व नागपूरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ।

मनपा नागरिकांना एकीकडे घरी राहण्याच्या सूचना देत असले तरी ,मनपाच्या अजब निर्णयाने नागरिकांना लॉक डाउन तोडून रस्त्यावर येण्याची वेळ आणली जात आहे । अशी भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे।