कामठी :-दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुदधा परमेश्वराप्रति अखंड निष्ठा आणि त्याग व बलिदानाचा संदेश देणारी ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली .यानिमित्ताने बकरे, मेंढ्या आदींची मोठ्या प्रमाणात कुर्बानी देण्यात आली तर यावर्षी बकऱ्यांच्या बाजारात सुमारे दीड कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.
दरवर्षी ईद निमित्त होणारी सामूहिक नमाज पठण हे कामठी शहरातील छावणी परिषद अंतर्गत येणाऱ्या रब्बानी मैदान इदगाह तसेच कामठी महामार्गावरील ख्रिस्त चर्च जवळील पटांगण इदगाह सकाळी 8 ते 9 दरम्यान होत होते मात्र यावर्षी एकाच ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्याचे ठरल्यानुसार कामठी महामार्गावरील ख्रिस्त चर्च जवळील मोकळे पटांगण इदगाह येथे सकाळी 9.15मिनिटांनी सामूहिक नमाज पठण करण्यात आले.
याप्रसंगी सामूहिक नमाज पठनासाठी शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.या इदगाह वर सामूहिक नमाजाचे अधिपत्य हाजी मो इम्रान साहब यांनी केले . तसेच शहरातील 39 मस्जिदित नमाज पठण करण्यात आले.सदर इदगाह मध्ये सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर उपस्थित समस्त मुस्लिम अनुयायांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते गुलाबपुष्प देत गळाभेट देऊन बकरी ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, नागपूर शहर पोलीस आयुक्त उपाध्याय, डीसीपी निलोतपल , तहसीलदार अरविंद हिंगे, एसीपी राजेश परदेसी, पोलिस निरीक्षक संतोष बाकल, वाहतूक पोलीस निरीक्षक यादव, छावणी परिषद उपाध्यक्ष पिल्ले, तसेच बरीएम जिल्हाध्यक्ष अजय कदम, शहराध्यक्ष दिपंकर गणवीर , उदास बन्सोड, सावला सिंगाडे, नारायण नितनवरे, दीपक सीरिया, चंद्रशेखर लांजेवार, फ्रान्सिस, भाजप शहराध्यक्ष विवेक मंगतानी, लाला खंडेलवाल, अजय पाचोली, सतिष जैस्वाल, उज्वल रायबोले, राजेश दुबे तसेच इकबाल कुरेशी, अशफाक कुरेशी आदी उपस्थित होते.
या बकरी ईद निमित्त पोलीस विभागातर्फे जागोजागी पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आले होते.
संदीप कांबळे कामठी