Published On : Tue, Aug 13th, 2019

टाटा सुमो मध्ये ६ गाईला कोबुन नेताना कन्हान पोलीसांनी पकडले.

कन्हान : – पाराशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत एम जी नगर येथे टाटा सुमो चारचाकी वाहनात निर्दयपणे ६ गाईला कोबुन अवैधरीत्या वाहतुक करतांना पोलीसांनी पकडुन ६ गाईला जिवनदान देऊन टाटा सुमो चारचाकी वाहनासह एकुण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील चालक वाहन सोडुन पसार झाला.

गोपनिय सुत्रा व्दारे टाटा सुमो चारचाकी वाहनात जनावरांना कोबुन कत्तलीकरिता कामठी कडे नेताना अवैध वाहतूकीची प्राप्त माहीती वरून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशा नुसार कन्हान पोलीसांनी शनिवार (दि १०) ला सकाळी पहाटे ४ ते ५ च्या वाजता च्या दरम्यान तारसा रोड वरील एम जी नार येथे पेट्रोलींग करित असता ना सापळा रचुन कन्हान पोलीसांनी एक टाटा सुमो क्रमांक एम एच ३४ एम ९८८८ गाडी मध्ये अवैधरीत्या गाईला निर्दयपणे कोबुन भरून कत्तलखाना कामठी कडे नेताना संस्यास्पद अस्थेत दिसली असताना कन्हान पोलिस स्टेशनचे थानेदार चंदकांत काळे यांचे मार्गदशनात हेडकास्टेबल राहुल रंगारी, राजेंद्र गौतम व बंटी गेडाम यांनी रात्रपाळीच्या गस्ती दरम्यान चारचाकी वाहन थांबविले असतानी ड्रायहर गाड़ी सोडुन पसार झाल्याने टाटा सुमो चारचाकी वाहनात ६ गाईला कोबुन भरल्याचे दिसुन आल्याने कन्हान पोलीसांनी ६ गाईला देवलापार येथील गौरक्षण सेवा केन्द्रात सोडुन जिवनदान दिले.

आणि २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७७ च्या कलम ५, ५ अ, ५ ब, ९, प्राणीछळ प्रतिबंधक कायदा १९६० नुसार ११ ड अन्वये वाहन मालक व चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

याच मार्गानी नेहमी कामठी कडे ट्रक व चारचाकी वाहनात जनावरे कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याने ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांच्या आदेशानुसार कन्हान थानेदार चंद्रकांत काळेे यांचे मार्ग दर्शनात हेडकास्टेबल राहुल रंगारी, राजेंद्र गौतम, बंटी गेडाम यांनी या कार्यवाहीत सक्रिय सहभाग घेतला.