Published On : Tue, Jan 1st, 2019

आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे या!

Advertisement

महापौरांचे आवाहन : ग्रीन व्‍हिजीलच्या सदस्यांना ‘स्वच्छता मित्र’चे ओळखपत्र प्रदान

नागपूर: स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपल्या नागपूर शहराने सहभाग घेतला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर व्हावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण, योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे या मोहिमेसाठी जनजागृती केली जात आहे. या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.

Gold Rate
26 May 2025
Gold 24 KT 95,800/-
Gold 22 KT 89,100/-
Silver/Kg 98,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत नागपूर शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ग्रीन व्‍हिजीलच्या सदस्यांनी ‘स्वच्छता मित्र’ बनण्यात पुढाकार घेतला. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ग्रीन व्‍हिजीलचे सुरभी जायस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, बिष्णूदेव यादव यांना ‘स्वच्छता मित्र’चे ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर व ग्रीन व्‍हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी सर्व ‘स्वच्छता मित्रां’चे अभिनंदन केले. ग्रीन व्‍हिजील प्रमाणेच नागपूर शहरातील प्रत्येक जबाबदार नागरिकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Advertisement
Advertisement
Advertisement