Published On : Tue, Jan 1st, 2019

मनपाच्या ३० कर्मचा-यांना निरोप

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे उपअभियंता राजेश ढोंबरे यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांना सोमवारी (ता. ३१) सेवानिवृत्ती निरोप देण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित निरोप समारंभाला यावेळी सहायक अधीक्षक (साप्रवि) मनोज कर्णिक, नितीन साकोरे, दत्तात्रय डहाके, डोमाजी भडंग, केशव कोठे, सुनील राऊत आदी उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते उपअभियंता राजेश ढोंबरे यांच्यासह सर्व निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले तर आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनविस यांनी मानले.

निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उपअभियंता राजेश ढोंबरे, मोहरीर पी. जी. ठाकरे, मलवाहक जमादार आर.एस. बागडे, नर्स परिचारीका एस.एस.गुकोसे, सब ऑफिसर यू.एन. बंड, एलोपॅथिक कम्पाऊंड ए.एम. निचट, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक एस.व्ही. आरघोडे, फायरमन एच.आर. कुरेशी, चपराशी प्रकाश चव्‍हाण, क्षेत्र कर्मचारी धनराज तलमले, जनार्धन कावळे, चौकीदार सतीश साखरे, मजदूर विजय लांजेवार, चंद्रप्रभा टेनपे, शरद बंडवार, बंडू सहस्त्रबुध्दे, रेजा मधुमाला खोब्रागडे, चौकीदार कम चपराशी/शिपाई जान मोहम्मद जीमल शेख, खलाशी सुरेश करंडे, सहायक शिक्षिका रमा निमजे, सुरेश कैथवास, तृप्ती वालदे, रामराव तुगपलवार, सुरेखा येवले, राजस्व निरीक्षक माणिक रामटेके, सफाई कामगार भीमराव साबळे, रमेश खांडेकर, अशोक नाहार, सत्यवान खोब्रागडे, कलाबाई करिहार यांचा समावेश आहे