Published On : Mon, Jun 28th, 2021

अंमलीपदार्थाची वाहतूक होत असल्यास सूचना द्या

– कुली, ऑटोचालकांना लोहमार्ग पोलिसांचे आवाहन

नागपूर: अंमली पदार्थाचे सेवन qकवा वाहतूक होत असल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन लोहमार्ग पोलिस निरीक्षक सतीश जगदाळे यांनी केले.
अंमलीपदार्थ विरोधीदिनानिमीत्त नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात जगदाळे बोलत होते. यावेळी त्यांनी भारवाहकांना (कुली) सूचना केल्या. अलिकडे अंमलीपदार्थामुळे तरूण पिढी मोठ्या प्रमाणावर गारद होत आहे. युवकांना यापासून वाचविण्यासाठी कुलींवर मोठी जबाबदारी आहे.

अंमली पदार्थाच्या तस्करीची कुली किंवा ऑटोचालकांना माहिती मिळू शकते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते पोलिसांना मदत करू शकतात. त्यामुळे कुली आणि ऑटोचालकांनी सतर्क रहावे, असेही ते म्हणाले. यावेळी सपोनि संदीप जाधव यांनी अंमलीपदार्थापासून होणारे दुष्परिणाम, आयुष्य उध्वस्त होण्यापासून कसे कुटुंबाला वाचविता येते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अलिकडेच लोहमार्ग पोलिसांनी एका ब्राउन शुगर तस्कराला पकडले.


त्याच्या माध्यमातून तिघांना गजाआड केले आहे. वर्षाला हजारो किलो गांजा कपडून जप्त करण्यात येतो. यावरून अंमलीपदार्थाच्या आहारी जाणाèयांचे प्रमाण किती आहे, हे लक्षात येते.

कार्यक्रमाचे आयोजन लोहमार्ग पोलिस नागपूर येथील पोहवा गजानन शेळके यांनी केले. कार्यक्रमाला पीएसआय विजय तायवाडे, राजेश पाली, नामदेव सहारे, अमोल qहगणे आणि लोहमार्ग ठाण्यातील कर्मचारी तसेच कुली बांधव उपस्थित होते.