Published On : Sat, Oct 17th, 2020

निराधारांना त्वरित अनुदान द्या- बसपा

संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत विधवा, अपंग, वृद्धांना मिळणारे आर्थिक सहाय्य विनाविलंब मिळावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी ने निवासी उप जिल्हाधिकारी रवींद्र खजंजी ह्यांना भेटून निवेदनाद्वारे केली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने निराधारांना दर महिन्याला देण्यात येणारी आर्थिक सहाय्य निधी मागील 6 महिन्यापासून मिळाली नाही. कोव्हीड मुळे आधीच गरीब निराधार असल्याने यांची आणखीनच गैरसोय झाली आहे, निरधारांना विनाविलंब मदत मिळावी अशी मागणी बसपा ने दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदन देणाऱ्यात नागपूर जिल्हा सचिव विलास पाटील, मध्य नागपूर इंचार्ज अभय डोंगरे, अध्यक्ष प्रवीण पाटील, महासचिव राजेश पाटील, कुणाल खोब्रागडे, दक्षिण पश्चिम चे सदानंद जामगडे, प्रकाश फुले ह्यांचा समावेश होता-उत्तम शेवडे