Published On : Sat, Oct 17th, 2020

बैठकीत अनुपस्थित अधिका-यांना कारण दाखवा नोटिस देण्याचे झलके यांचे निर्देश

नागपूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक श्री. हरीश ग्वालबंशी यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३(ए), ५४, ५५, व ५६ अंतर्गत बांधकामाचे नकाशे मंजूर करण्यासंदर्भात महापौर श्री. संदीप जोशी व्दारे गठित समितीची बैठक शुक्रवारी (१६ऑक्टोंबर) ला डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली.

या बैठकीची अध्यक्षता, स्थायी समितीचे सभापती श्री. विजय (पिंटू) झलके यांनी केली. बैठकीत ‍ काही अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे अधिका-यांना कारणे दाखवा नोटिस जारी करण्याचे निर्देश श्री. झलके यांनी दिले.

श्री. झलके यांनी दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. याची सूचना सर्व संबंधीत विभागांना देण्यात आली होती तरी पण अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बैठकीचे सदस्य्, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय निपाणे यांना अनुपस्थित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे त्यांनी निर्देश दिले.


या बैठकीत विरोधी पक्षनेते श्री. तानाजी वनवे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती श्री. अभय गोटेकर, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे उपस्थित होते.