Advertisement
नागपूर : लकडगंज भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
आरोपी सचिन जगदीशप्रसाद मिश्रा याने पीडित तरुणीकडे पाठीमागून येत तिचा विनयभंग केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर तरुणीने आरडाओरड केली आणि आपल्या वडिलांना व भावाला घटनेबाबत सांगितले.
तत्काळ कारवाई करत वडिल व भाऊ यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ७४ आणि ७५(२) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.