Published On : Mon, Apr 3rd, 2017

चंद्रपूरमध्ये एका मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला केली बेदम मारहाण (व्हिडिओ)


हा संपूर्ण प्रकार थोडा विचित्र होता….

प्रेमप्रकरणातील वाद गेल्या कित्येक दिवसांपासून चव्हाट्यावर येत आहे. सकाळीच पुण्यात एकतर्फी प्रेमातून भाजप आमदारांच्या मुलीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये तिची बोटं तुटली आहेत. असं असतानाच चंद्रपूरच्या वरोरामध्ये प्रेमात फसवणूक झाल्याने तरुणीने युवकाला बेदम चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंनदवन चौकात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. संबंधित तरुण आणि तरुणीचे दोन वर्षांपासून संबंध होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्यामुळे या दोघांच कडाक्याचं भांडण झालं होतं.

तरुणाने लग्नासाठी दुसऱ्या मुली पाहायला सुरुवात केल्याचं तरुणीला समजलं. मूळचा भंडाऱ्यातील असलेला हा तरुण काल एका परीक्षेसाठी वरोऱ्यात येणार असल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यानंतर तिने थेट वरोऱ्यात येऊन तरुणाला गाठलं आणि त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली. आणि हा सगळा प्रकार भर रस्त्यात घडला आहे.

पण, तरुण टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या तरुणीने भर रस्त्यात त्याची जोरदार धुलाई केली. मी तुझ्यासाठी लग्न मोडलं, आई वडिलांना सोडंल त्याचप्रमाणे मी अॅब्रॉर्शन देखील केलं. पण तूझ्यासारखी मुलं आम्हा मुलींनाच फसवतात. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला तेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दोघांना पोलिस ठाण्यात नेलं. तिथं दोघांच्या पालकांना बोलावून सामंजस्याने हे प्रकरण मिटलं. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिला.

या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. दोघांनाही समज देऊन घरी पाठवण्यात आलं. त्यामुळे फक्त रस्त्यातील बघ्यांना काही काळ विरंगुळा मिळाला.