Published On : Tue, Jun 12th, 2018

मोक्षधामनजिकचा नाग नदीवरील पूल लवकरात लवकर खुला करावा!

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे मोक्षधाम घाट येथील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. हा पूल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. मंगळवारी (ता.१२) ला सकाळी आयुक्तांनी मोक्षधाम येथील निर्माणाधीन पुलाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते. मोक्षधाम पुलाच्या सीमेंटीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. पुलाच्या कामाला बराच उशीर झाला आहे, आता उशीर नको व्हायला, अशी सूचना करत या महिन्याच्या अखेरीस पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे. हा पूल या महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असेही आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांनी इमामवाडा परिसराची पाहणी केली.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोक्षधाम पुलाकडून मेडिकल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईन फुटल्याने पाणी वाहत चालले आहे. परिसरात चिखलही झाला आहे. ती पाईपलाईन तातडीने संबंधित अधिकाऱ्याकडून दुरूस्त करून घ्यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. स्थानिक व्यावसायिक संस्थानांनी आपल्या दुकांनासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना देखील आयुक्तांनी यावेळी केल्या.

सहकार नगर येथील नाल्याच्या पुलाची पाहणी.

सहकारनगर घाटनजिक असलेल्या नाल्यावरील असलेल्या पुलाची पाहणी यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह आणि अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केली. शनिवारी व रविवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे पुलालगत असलेली पाईपलाईन विस्कळीत झाली होती. ती पाईपलाईन दुरूस्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील पाच दिवसात काम पूर्ण करण्याचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी आदेश दिले. यापुढे असे प्रकार घडणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शोधून काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Advertisement
Advertisement