रामटेक :-कोविड १९या संसर्गजन्य विषाणू असलेल्या महामारीमुळे आपले अनेक आप्तजन मृत्युमुखी पडले..अनेकांचे घरचे प्रमुख व्यक्ती गेल्याने अनेक बालके अनाथ झालेली आहे.
कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्य शासनाने ४५वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यांतयेत असून लसीबाबत असलेले गैरसमज.अफवा दुर करणे समस्यांचे निराकरण करून जनजागृती करण्यासाठी यासाठी काचुरवाही व खोडगाव येथील लसीकरण वाढावे.यासाठी पथनाट्यातून जनजागृती करण्यांत आली.
घरोघरी मार्गदर्शन,गृहभेटी,कोरोना विषयक नियम पाळणे,मास्क वापर, सामाजिक अंतर पाळणे याविषयी माहिती देण्यांत आली.पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने,यांनी काचुरवाही ग्रामपंचायत अंतर्गत मोहिमेत सहभाग घेतला.
मार्गदर्शन कार्यक्रमात दुर्गा इडपाची,धनराज थोटे,सारिका मोटघरे,श्रीमती हटवार, शिक्षक वरठी कोळवते.स्नेहसदनचे शाळाप्रमुख पंकज पांडे.गटसाधन केंद्र रामटेक चे साधनव्यक्ती सुधाकर कुमरे .कविता उके, विवेक झाडे यांनी विशेष सहकार्य केले.गावकर्यांनी अभियानाला प्रतिसाद दिला.