Published On : Wed, Mar 13th, 2019

महा मेट्रोतर्फे साजरा करण्यात आला ४८वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह

चारही रिचवर कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन, अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

नागपूर: महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाल्यांपासून नेहमीच सुरक्षेला प्रथम प्राध्यान्य देण्यात आले आहे. नुकताच ४८वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह महा मेट्रोतर्फे साजरा करण्यात आला. शहरात सुरु असेलल्या चारही रिचवर (मेट्रो मार्गिका) राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अंतर्गत महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे सर्व नियमांचे महत्व पटवून देण्यात आले. सप्ताहादरम्यान मेट्रो मार्गिकांवर होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी विविध प्रात्यक्षिके कर्मचाऱ्यांतर्फे सादर करण्यात आले.

महा मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे मॉकड्रीलचे आयोजन कारण्यात आले होते, यात कर्मचाऱ्यांनी आपातकालीन परिस्थित निभवण्यात येणारी भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली. यासह विविध स्पर्धेचे आयोजन देखील कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देखील कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्य कुशलतेचे उदाहरण दिले. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे अधिकाऱ्यांच्याहस्ते वितरित करण्यात आले. प्रकल्पाचे कार्य सुरु असतांना नेहमीच सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी शपथ कर्मचाऱ्यांनी घेतली.

हिंगणा मार्गवरील लिटिल वूडमध्ये तयार करण्यात आलेल्या सेफ्टी पार्कमध्ये देखील महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांसह इतर कामगारांना, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सुरक्षेसंबंधित प्रशिक्षण दिले जात आहे. याठिकाणी प्रकल्पात उपयोग होणाऱ्या विविध उपकरणांची माहिती देण्यात येते. शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शासकीय/निमशासकीय व खाजगी क्षेत्रात कार्य करणारे कर्मचारी याठिकाणी सेफ्टी पार्कला भेट देत असतात.