Published On : Wed, Mar 13th, 2019

१६ तासांचे सीताबर्डी फोर्ट-२ शटडाऊन आता ७ मार्च

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी गांधीबाग झोन येथे ४००x४००मिमी च्या मुख्य वितरण वाहिनीवर कॉटन मार्केट चौक येथे आंतरजोडणीचे काम काही तांत्रिक अडचणी मुले आता गुरुवार ७ मार्च रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे. आधी हेच कार्य बुधवार ६ मार्च ला करण्याचे ठरले होते

या आंतरजोडणीला जवळपास १६ तासांचा अवधी लागेल. या कामामुळे सीताबर्डी फोर्ट २ जलकुंभाचा पाणीपुरवठा आता ७ मार्च सायंकाळ ५ वाजता पासून ८ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत बाधित राहील.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यादरम्यान पुरवठा बाधित राहणारे भाग: घाट रोड, कॉटन मार्केट, शनिवारी, चांडक लेआऊट, सुभाष रोड, गणेशपेठ, गाडीखाना, कर्नलबाग, रामाजी वाडी, नवी शुक्रवारी, कोठी रोड, जोग गल्ली, मातंगपुरा, शिंगाडा मार्केट, ढोलवाली गल्ली, नवी शुक्रवारी पाटील हॉस्पिटलमागे, जोहरीपुरा,

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही बंद राहणार असल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement