Published On : Wed, Jun 5th, 2019

चाकूच्या धाकावर दुचाकीस्वाराची लुबाडणूक

कामठी: स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी भोवरी मार्गावर मौदाहून नेरी कडे आई, पत्नी व मुलीला दुचाकीने सोबत घेऊन येत असता अज्ञात चार दरोडे खोरांनी दोन दुचाकीने येऊन चाकूच्या धाकावर दुचाकीस्वारासह सोबतीला असलेल्या दुचाकीस्वाराचा आई व पत्नी च्या शरीरावरील सोन्या चांदीचे आभूषण सह 10 हजार रुपये नगदी व एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 1 लक्ष 7 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढल्याची घटना काल रात्री अकरा दरम्यान घडली यासंदर्भात पीडित फिर्यादी चंद्रशेखर गोविंदराव वंजारी वय 36 वर्षे रा नेरी ता कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चार आरोपीविरुद्ध भादवी कलम 341, 394, 34 अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार सदर फिर्यादी दुचाकीचालक चंद्रशेखर वंजारी हे मौदा येथील खाजगी कामे आटोपून दुचाकी क्र एम एच 40 यु 4008 ने आई सुनंदाबाई, पत्नी मंगला व मुलगी मनस्वी ला सोबतीला घेऊन आवंढी भोवरी मार्गे नेरी गावाकडे जात असता दोन दुचाकीने आलेल्या चार अज्ञात आरोपीने दुचाकी आडव्या करून चाकूचा धाक दाखवून लुबाडणूक केल्याचा प्रयत्न केला याला पीडित फिर्यादी चंद्रशेखर ने मज्जाव केला असता आरोपीतानी फिर्यादी च्या डाव्या हाताच्या दंडावर वार करून जख्मि करीत त्याच्याकडीलं नगदी 10 हजार रुपये, एक मोबाईल व पत्नी व आईच्या अंगावर असलेले सोन्या चांदीचे आभूषण असे एकूण 1 लक्ष 7 हजार रुपयांचा मुद्देमाल लुबाडणूक करून पळ काढला .घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवीत तपासाला गती दिली आहे

– संदीप कांबळे कामठी