Published On : Sat, Aug 22nd, 2020

रामटेक शहरात राखी तलाव येथे गौरी विसर्जन समारोप

Advertisement

रामटेक हरितालिका तृतीया भाद्रपद महिन्याचा शुक्लपक्षाच्या तृतीयेला साजरी करतात. शास्त्रानुसार हरितालिका तृतीया सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. या व्रताचे वैशिष्ट्ये म्हणजे की ह्याचा उपवास सवाष्ण बायका, कुमारिका मुली, विधवा बायकांच्या व्यतिरिक्त कमी वय असलेल्या मुली देखील करू शकतात. हे व्रत नीरजाला देखील करू शकतात. या व्रतामध्ये गौरी पूजन करण्याची प्रथा आहे.

वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. हरितालिका च्या दिवशी स्त्रिया आणि मुली आपली गौरी घेऊन तिला धुण्यासाठी जातात. व परत घरी आल्यानंतर गौरी ची स्थापना करतात. त्यांनतर भजने, आरती च कार्यक्रम असतो. या दिवशी पासून ते दुसऱ्या दिवशी पर्यंत स्त्रियांचा व मुलींचा व्रत असतो.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी च्या दिवशी गौरी ला विसर्जन करण्यात येते.

रामटेक येथील धार्मिक स्थळ राखी तलाव येथे स्त्रिया व मुलींनी गौरी मातेचा पूजन करून , आरती करून विसर्जन केलं. यावेळी सामाजिक अंतराचे पालन झाले हे विशेष.

स्त्रियांनी वाळूच्या शिवलिंगाचे व गौरी चे विसर्जन केलं. मुलींनी आणि सौभाग्यवती स्त्रियांनी जन्मोजन्मी मनासारखं पती मिळावा किव्वा मिळालेळ्या पती साठी प्रार्थना केली. यावेळी कश्यप , तडस ,या स्त्रिया उपस्थित होत्या. शंख वादन टेकाडे यांनी केले. . .