Published On : Sat, Aug 22nd, 2020

रामटेक तालुक्यात निघाले पुन्हा १० पाजिटिव.

रामटेक -अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे . आता रामटेक तालुक्यातील पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. संक्रमिता कोरोना रूग्ण संख्या १०० वर पोहचली आहे.

४५वर्षाचे ३ तरूण तर ३५ वर्षाची महीला १९ वर्षाची मुलगी पॉझिटिव्ह निघाले.
रामटेक शहर मधील त्या कुटूंबातील त्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या राजाजी वॉर्ड येथील पती पत्नी आणि मुलगा निघाला कोरोना सक्रमित. ५३ वर्षाचा पुरूष त्याची ४५ वर्षीय पत्नी व २७ वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह निघाला.

आरोग्य केंद्र नगरधन ला ६ पॉझिटिव्ह निघाले असल्याचे माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता
काकडे यांनी दिली. या वेळी नायब तहसिलदार रासकल मॅडम , ग्राम पंचायत चे सचिव उइके , प्राथमिक आरोग्य केंद्र नगरधन चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता काकडे आरोग्य सेवक रुकमुडे, किशोर वैद्य , पटांगे यांनी सहकार्य केले.

तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या १०० वर गेली आहे.

त्यापैकी स्वस्थ झालेले आइसोलेशन मधे ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार यानी दिली । तहसीलदार बाळासाहब मस्के , गत विकास अधिकारी बी. डबल्यू यावले,पोलीस निरीक्षक दिलिप ठाकूर , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार ,नगरा परीषद चे अधिकारी राजेश सव्वालाखे ,रोहीत भोईर हे उद्भवणाऱ्या परिस्थीती वर लक्ष ठेऊन आहेत .