Published On : Sat, Aug 22nd, 2020

बसपा जिल्हा सचिवपदी मनोज रंगारी यांची नियुक्ती

कामठी :-बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा सचिव पदी कामठी रहिवासी मनोज रंगारी यांची नियुक्ती केली असून ही नियुक्ती बसपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव भाऊसाहेब गोंडाने यांनी केली असून या नियुक्ती बद्दल नवनियुक्त जिल्हा सचिव मनोज रंगारी यांनी महाराष्ट्र प्रदेश महासचिव भाऊसाहेब गोंडाने यासह पक्षातील समस्त वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.

तर या नियुक्ती बद्दल बसपा चे महिला पदाधिकारी व कामठी नगर परिषद चे महिला व बाल कल्याण सभापती रमाताई गजभिये, बसपा पदाधिकारी नागसेन गजभिये, रायभान गजभिये, संतोष मेश्राम, विकास रंगारी, गीतेश सुखदेवे, रवी मधूमटके, अनिल कुरील, आशिष जाधव, भीमराव राऊत, विजय चव्हाण, विजय कडबे,सोनू बोरकर,शेषराव गेडाम, योगेंद्र मेश्राम, वानखेडे, सुखदेवे, संदीप रामटेके, विकास टेंभेकर, नितीन सहारे, शशिकांत खोब्रागडे, सुरेश बांगर आदी पदाधिकारी कार्यकर्तेगण सह प्रोग्रेसिव्ह मुव्हमेंट संघटने तर्फे राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे, कोमल लेंढारे, आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला

संदीप कांबळे कामठी