Published On : Tue, Sep 3rd, 2019

रामटेक येथे गौरी विसर्जन उत्साहात संपन्न

रामटेक: हरितालिकेनिमित्य घरोघरी गौरी स्थापना करण्यांत येवून विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने स्थानिक राखी तलावात महिलांनी गौरी विसर्जन केले.

वाजत गाजत पारंपारीक वेशभूषेतील महिलांनी राखी तलाव परिसर फुलून गेला होता. तलावाच्या काठावर पुजा अर्चा आरती करून गौरीचे विसर्जन सुरू होते .एकमेकांना प्रसाद वितरण व हळदीकुंकु कार्यक्रमात सकाळपासून रिमझिम पावसात महिला या उत्सवात सहभागी झाल्या होत्या.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नगरषरिषदेतर्फे मंडप चहा व निर्माल्यसंकलनाची उत्तम व्यवस्था होती.ह्यावेळी नगर परिषद उपाध्यक्षा शिल्पा रणदिवे,नगरसेवक संजय बीसमोगरे , नगरसेविका लता कामडे .उमेश रणदिवे आदींची उपस्थिती होती.