Published On : Wed, Feb 14th, 2018

ऑस्कर विजेत्या विकास साठ्ये या मुंबईच्या अभियंत्‍यांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

मुंबई : मुंबईचा अभियंता विकास साठ्ये यांनी तांत्रिक विभागासाठी देण्यात येणारा मानाचा ऑस्कर पुरस्कार शनिवारी पटकावला. श्री.साठ्ये यांनी मिळविलेल्या यशाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानचिन्ह देऊन मंत्रालयात गौरव केला.

यावेळी सांस्कृतिक कार्य, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे सचिव तथा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी उपस्थित होते.

Advertisement

कॅमेरा तंत्रज्ञान व तांत्रिक विभागासाठी श्री. साठ्ये यांच्यासह अन्य चौघांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स येथे ‘सायंटिफिक अँड टेक्निकल ऑस्कर २०१८ ऑस्कर सोहळा’ रंगला होता. कॅमेरा तंत्र पुरस्कारांमध्ये चार जणांच्या चमूची निवड झाली होती. ‘शॉटोव्हर के-1 कॅमेरा सिस्टीम’ तंत्राचा सिनेमात यशस्वी वापर केल्याबद्दल चौघांना ऑस्कर मिळाला आहे. या चौघांपैकी एक असणाऱ्या विकास साठ्ये यांनी हे कॅमेरा तंत्र विकसित केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement