Published On : Thu, Sep 30th, 2021

चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत “कचरा अलग करो अमृत दिन” उपक्रम

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे “आजादी का अमृत महोत्सव” मोहिमेअंतर्गत शहरात सर्व सतराही प्रभागांमध्ये “कचरा अलग करो अमृत दिन” हा उपक्रम दिनांक 27 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात आला.

नेहमी घंटागाडी कर्मचारी हे घरोघरी जाऊन दोन प्रकारे कचरा (ओला व सुखा कचरा ) गोळा करतात. पण “कचरा अलग करो अमृत दिन” या उपक्रमांतर्गत घंटागाडी कर्मचाऱ्यांना लोकांकडून चार प्रकारचा कचरा अलग करून गोळा करण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, इ कचरा, हजार्डस (धोकादायक) कचरा अशाप्रकारे लोकांकडूनच कचऱ्याचे अलगीकरण करून घेऊन कचरा गोळा करण्यात आला. उरलेले, खरखटे अन्न कचरा म्हणून न फेकता त्याचे घरच्या घरी विघटन करून खत निर्मिती करण्यासंदर्भात चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Advertisement

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर तर्फे स्वयंसेवक मार्फत घरोघरी जाऊन स्वच्छतेचा आढावा घेण्यासंदर्भात माहिती गोळा करण्यात आली. यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली. यामध्ये आपण कचरा देताना कचऱ्याचे चार प्रकारे विलगिकरण करून कचरा देता का? घरच्या घरी कचऱ्याचे विघटन करतात का? कचऱ्याचा पुनर्वापर करता का? आपण स्वच्छतेसंदर्भात समाधानी आहात का? अशाप्रकारे स्वच्छतेच्या आढावा संदर्भात विविध प्रश्न लोकांमध्ये विचारण्यात आले.

स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन ही प्रश्नावली लोकांकडून सोडवून घेतली. हा अहवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे पाठवण्यात आला. अशाप्रकारे चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत “कचरा अलग करो अमृत दिन “हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement