Published On : Mon, May 14th, 2018

नागपुरातील जरीपटक्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

Woman-gang-rape
नागपूर: तरुणीला घरी सोडून देण्याची बतावणी करून दोन आरोपीने जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला एका घरात नेऊन तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित तरुणीने रविवारी पोलिसांकडे नोंदवली. त्यानंतर मध्यरात्री या प्रकरणात पोलिसांनी अपहरण करून बलात्कार करणे आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणी १८ वर्षांची आहे. ती जरीपटक्यात एका झोपडपट्टीत राहते. गरिब कुटुंबातील ही तरुणी ब्युटीपार्लरचे क्लास करते. नेहमीप्रमाणे ती शनिवारी सायंकाळी क्लासला गेली होती. पार्लर बंद असल्याने ती तेथून मैत्रीणीच्या घरी गेली. रात्री ८ च्या सुमारास ती आपल्या घराकडे पायी निघाली. कामठी मार्गावरील पुलाजवळ मागून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी कुठे जात आहे, अशी तिला विचारणा केली. तिने त्यांना प्रतिसाद दिला नाही. आरोपींनी तिला तुझ्या घरी सोडून देतो, असे म्हणत तिला जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर मधात बसवले. तेथून आरोपी कामठी नाका नंबर दोन जवळच्या एका घरात पोहचले. तेथे त्यांनी तरुणीचे हात बांधून तोंडावर रुमाल बांधला. त्यानंतर ते दारू पिले आणि तरुणीवर या दोघांनी रात्रभर आलटून पालटून बलात्कार केला. आरोपींनी तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला.

Advertisement
Advertisement

पोलिसांनी दिवसभर तिष्ठत ठेवले
रविवारी सकाळी ९ च्या सुमारास तरुणी घरी पोहचली. रात्रभर तू कुठे गायब होती, अशी विचारणा करून तिच्या आईने तिला बोलते केले असता तिने त्यांना उपरोक्त प्रकार सांगितला. त्यानंतर दुपारी ती पालकांसह जरीपटका ठाण्यात पोहचली. पोलिसांनी तिला दिवसभर तिष्ठत ठेवले. ही माहिती कळताच परिमंडळ पाचचे प्रभारी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी रात्री ८ वाजता जरीपटका पोलीस ठाणे गाठून ठाण्यातील अधिकारी, कर्मचा-याना खडसावले. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली. तरुणीचे मेडिकल करण्यात आले. तिकडे आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक तहसीलमध्ये पोहचले. मध्यरात्री या प्रकरणात अपहरण करून सामुहिक बलात्कार करणे आणि अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कलम ३६६, ३७६ (ड), ३७७, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement