Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी प्रणालीद्वारे परवानग्या मिळणार सर्व ना हरकत प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार

महापौर निता ठाकरे यांनी घेतला गणेशोत्सवाचा पूर्वतयारीचा आढावा
Advertisement

नागपूर,: महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला गणेशोत्सव यावर्षी देखील शहरात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी तसेच गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता मनपासह नासुप्र, पोलीस, वाहतूक विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घ्यावी. गणेशोत्सव मंडळांना ना हरकत प्रमाणपत्रे व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने सुलभेतेने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.

पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 6) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात घेतला. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी व श्रीमती विनीता शाहू, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मनपाच्या वैद्यकीय व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) श्री. रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. नितीन बने, मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी, डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह मनपाच्या विविध विभागाचे प्रमुख तसेच नासुप्र, धर्मादाय आयुक्त, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी गणेशोत्सवाच्या संदर्भात माहिती दिली व पीपीटीच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात मनपाने केलेल्या तयारीची माहिती दिली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना परवानग्या घेताना त्रास होणार नाही तसेच नागरिकांनाही या काळात त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले. गणेशोत्सव मंडळांसाठी आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे, एक खिडकी योजनेद्वारे उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात मनपाने तयारी केलेली आहे. मनपाच्या मुख्यालयासह प्रत्येक झोनमध्ये सुद्धा गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. ना हरकत प्रमाणपत्रांसाठी पोलीस विभाग, वाहतूक विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी झोन मध्ये हजर राहिल्यास गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना त्रास होणार नाही, असेही महापौरांनी यावेळी सुचविले. त्याचप्रमाणे महाल भागात गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी शहरातील इतर भागातील मैदानांमध्ये विक्रीची व्यवस्था करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले. गणेशोत्सव मनपा व पोलीस विभागाने समन्वय साधून याकाळात व्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले.

ड्रोनद्वारे गर्दीवर नियंत्रण : नरेंद्र (बाल्या) बोरकर

Advertisement

यावेळी सूचना करताना सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी विसर्जन स्थळी टॉवर उभारून ड़्रोनद्वारे शुटिंग करण्याची सूचना केली. यामुळे त्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे. हे ड्रोन कॅमेरे नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहे. यासाठी पोलिस विभागाने टॉवर एक पोलीस शिपाई तैनात करावा, अशी सूचना त्यांनी केली. अनेक ऑनलाईन परवानगी मिळते परंतु प्रमाणपत्रांवर पोलीस वाहतूक विभागाचे अधिकारी स्वाक्षरी करीत नसल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वारंवार पोलीस ठाण्यात जावे लागते, अनेकदा तीन-चार दिवस स्वाक्षरी होत नाही. यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांनी योग्य निर्देश द्यावे, अशी सूचना सत्तापक्ष नेते श्री. बोरकर यांनी केली. महाल भागातील बडकस चौक व अग्रसेन चौकात गणेश मूर्तीच्या खरेदीच्यावेळी गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहत नाही. यासंदर्भात वाहतूक विभागाने योग्य खबरदारी घ्यावी, असेही श्री. बोरकर यांनी सुचविले.

आगीपासून संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करा: विश्वास नांगरे पाटील

पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व परवानग्या तात्काळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी मोठ्या गणेशोत्सव मंडळांना आगीपासून संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना केली. अनेकदा आग लागल्यामुळे मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक बाधित होण्याची शक्यता असते. गणेशोत्सव साजरा करताना गर्दीवर नियंत्रण, घातपात होणार नाही, याची खबरदारी व वाहतुकीचे नियंत्रण अशा तीन बाबी विचारात घेण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळाने ध्वनी प्रदूषण होणार नाही याकरिता आवाजावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगत यासंदर्भात गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देऊन अधिक आवाजाने होणाऱ्या दुष्परिणामाबाबत संवेदनशील करण्याची आवश्यकता असल्याचे श्री. नांगरे पाटील यांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त श्री. रमेश धुमाळ यांनी गणेशमूर्तीची खरेदी करण्यासाठी चिताळ ओळ व महाल भागात गर्दी होत असल्याने मनपाने शहरातील विविध भागातील मैदानांमध्ये विक्रीसाठी जागा उपलब्ध दिल्यास गर्दीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील, अशी सूचना केली.

जीपीएसचा प्रयोग करणार – डॉ. विपीन

यावेळी माहिती देताना आयुक्त डॉ. विपीन यांनी गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने गणेशोत्सव मंडळांना परवानगी व इतर ना हरकत प्रमाणपत्रे देण्याची पद्धत सुरू केली आहे. यात वाहतूक विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत विभागाची मंजुरी मिळणार आहे. याशिवाय विसर्जनाच्यावेळी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. यासाठी विसर्जनाच्या वाहनाला जीपीएस प्रणाली लावण्याचा प्रयोग करण्यात येईल. यामुळे वाहतूक विभागाला सुद्धा कुठे गर्दी आहे, याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यास मदत होईल. जे गणेशोत्सव मंडळे नियमितपणे त्याच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात. त्यांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी. त्याचप्रमाणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी सुद्धा यावर्षापासून एक खिडकी पद्धतीने ऑनलाईन उपलब्ध होईल, असेही आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांचा सत्कार

पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांचा यावेळी मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर व आयुक्त डॉ. विपीन यांनी सत्कार केला.

मनपातर्फे करण्यात येणाऱ्या व्यवस्था

– गणेश मंडळांना परवानगीसाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध

– गणेश मंडळांना मनपाच्या सर्व झोनमध्ये परवानगी देण्यात येईल.

– एकाच ठिकाणी पोलीस, अग्निशमन, धर्मादाय आयुक्त कार्यालय व वाहतूक विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध होईल.

– निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य रथ तयार करण्यात येईल. शहरातील विविध भागात फिरून निर्माल्य जमा करणार.

– विसर्जनाच्या ठिकाणी मनपाची अँबुलन्स सह उपचाराची सुविधा उपलब्ध राहील.

– विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येईल. तसेच मोठ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठे तलाव करण्यात आले. यात गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज भागात कच्छी विसा व कोराडी भागात मोठ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची तयार करण्यात येईल.

– घरगुती व छोट्या गणेश मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मनपातर्फे विसर्जन रथ शहरात उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मूर्तीच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Advertisement
AAI में नौकरी और 60 हजार स्टाइफंड का झांसा

AAI में नौकरी और 60 हजार स्टाइफंड का झांसा

मंदिर चोरी का खुलासा, CCTV वाला आरोपी गिरफ्तार #NagpurNews #Crime #TempleTheft #CCTV #CaughtOnCamera

मंदिर चोरी का खुलासा, CCTV वाला आरोपी गिरफ्तार #NagpurNews #Crime #TempleTheft #CCTV...

पिता की मौत के बाद उठाया बड़ा कदम #NagpurNews #RescueOperation #MissingChild #Police #ChildSafety

पिता की मौत के बाद उठाया बड़ा कदम #NagpurNews #RescueOperation #MissingChild #Police...

गिट्टीखदान के गायकवाड़ लेआउट में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews #TheftCase #CrimeAlert

गिट्टीखदान के गायकवाड़ लेआउट में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews #TheftCase...

हिंगना के चक्री घाट जंगल में अज्ञात युवक का शव मिला #NagpurNews #Crime #PoliceInvestigation #mystery

हिंगना के चक्री घाट जंगल में अज्ञात युवक का शव मिला #NagpurNews...

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges