Published On : Sat, Jun 20th, 2020

नागपुरातील गांधीबाग, भोईपुरा, नरसाळ्यातील परिसर सील

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून, प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गांधीबाग कपडा मार्केट, नरसाळा, भोईपुरा, गणेशपेठ, छत्रपतीनगर, परसोडीतील परिसर सील करण्यात आला.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 16 मधील छत्रपतीनगरातील आझाद हिंद सोसायटीत कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यामुळे आझाद हिंद सोसायटीच्या उत्तरेस विनायक कासुलकर यांचे घर ते आर. एम. झाडे यांचे घर, पूर्वेस आर. के. अवचट ते मोहोड यांचे घर, दक्षिणेस नागभूमी ले-आऊट, पश्‍चिमेस विठ्ठल सराडकर यांचे घर ते आर. एम. झाडे यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. याच झोनमधील परसोडीतील डंबारे ले-आउटच्या उत्तरेस दांडगे ते सातपुते यांच्या घरापर्यंतची रांग, पूर्वेस सातपुते यांचे घर ते राजकमल अपार्टमेंट, शेलारे ते राजकमल अपार्टमेंट, शेलारे यांचे घर ते दांडगे यांच्या घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

धंतोली झोनअंतर्गत गणेशपेठ येथील राहुल कॉम्प्लेक्‍स परिसरही सील करण्यात आला. उत्तर पश्‍चिमेस संरक्षक भिंत कॉर्नर, उत्तर पूर्वेस म्हाडा कॉम्प्लेक्‍स, दक्षिण पूर्वेस सिव्हर रोड, दक्षिण-पश्‍चिमेस अरंद गल्ली परिसरात निर्बंध लावण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 12 मधील न्यू जागृती कॉलनी परिसराच्या पूर्वेस राऊत यांचे घर, पश्‍चिमेस ब्लूमिंग बर्ड शाळा, उत्तरेस सतेंद्र मिश्रा यांचे घर, दक्षिणेस श्री गणेशन यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

गांधीबाग महाल झोनअंतर्गत प्रभाग 19 मधील मनपा खदान शाळेच्या दक्षिण-पश्‍चिमेस सत्तोबाई मंगल गौर यांचे घर, दक्षिण पूर्वेस नूतन गंगोत्री यांचे घर, उत्तर पूर्वेस खदान शाळा, उत्तर पश्‍चिमेस उदय मित्र हनुमान मंदिर परिसर प्रतिबंधित करण्यात आला. याच प्रभागातील भोईपुरा परिसराच्या उत्तर पूर्वेस दुर्गेश गौर यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस भगीरथ गौर यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस गुरुदीपसिंग यांचे घर, दक्षिण पूर्वेस ज्योती नायक यांचे घरापर्यंतचा परिसर “लॉक’ करण्यात आला.

गांधीबाग कपडा मार्केट परिसरातही कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे कपडा मार्केटच्या उत्तर पश्‍चिमेस आहूजा कलेक्‍शन, उत्तर पूर्वेस राहुल ट्रान्सपोर्ट, दक्षिण पूर्वेस गर्ग रोडवेज, दक्षिण पश्‍चिमेस युनिक क्रिएशनपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. हनुमाननगर झोनअंतर्गत प्रभाग 29 मधील नरसाळा येथील संत ज्ञानेश्‍वरनगरातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला. यात संत ज्ञानेश्‍वरनगरातील उत्तर पश्‍चिमेस नाला, उत्तर पूर्वेस नारायण देसाई यांचे घर, दक्षिण पूर्वेस नरेंद्र सोमकुवर यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस नाला या परिसराचा समावेश आहे.