Published On : Fri, Feb 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

वाठोडा येथील जिजामाता नगरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; ९ जणांविरोधात गुन्हा

Advertisement

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिजामाता नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान रोख ५ हजार ४२० रुपये, पत्ते व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाठोडा पोलिसांच्या शोध पथकाने गुरुवारी सायंकाळी ७ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान जिजामाता नगर येथील प्लॉट क्रमांक ६४, मनोज बावणे यांच्या घरामागील मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी संबंधित आरोपी पत्त्यांवर पैशांची बाजी लावत जुगार खेळताना आढळून आले.

Gold Rate
Apr 25 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,48,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणात मनोज कृष्णा बावणे (२३), घनश्याम मुरलीधर दाणी (२९), जितेश डेकाटे (३२), आयुष सोनारघरे (२२), विकास कांबळे (२२), यश झाडे (२३), प्रितम सलामे (३२), किशोर बावणे (२८) आणि रोहित कच्छावा (३०) अशी आरोपींची नावे असून सर्वजण नंदनवन परिसरातील रहिवासी आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५,४२० रुपयांची रोख रक्कम, पत्त्यांचा संच व अन्य जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेतन कदम (झोन ५) आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रोहित ओव्हाळ (कळमना विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement