Published On : Fri, Feb 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील आरटीओ अधिकाऱ्यावर आरोप; गणवेशाशिवाय ड्युटी करत बेकायदेशीर वसुलीचा दावा

Advertisement

नागपूर : शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) एका अधिकाऱ्यावर गणवेश न परिधान करता ड्युटी बजावत असताना वाहनचालकांकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून शहरात चर्चा रंगली आहे.

व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी आरटीओच्या फ्लाइंग स्क्वॉडची MH 04 – LT 6631 क्रमांकाची गाडीमध्ये बसलेले दिसतात. मात्र त्यांनी अधिकृत गणवेश परिधान केलेला नसल्याचे दिसून येते. व्हिडिओ चित्रीकरण करणारी व्यक्ती स्वतःला ट्रक चालक असल्याचे सांगत असून, चलन कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांवर थेट आरोप करताना ऐकू येते.

Gold Rate
Apr 24 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,41,300 /-
Silver/Kg ₹ 2,44,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कळमना परिसरातील घटना
ही घटना शुक्रवारी सायंकाळी कळमना परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये काही नागरिक संबंधित अधिकाऱ्याला घेराव घालत प्रश्न विचारताना दिसतात. “गणवेशाशिवाय कारवाई कशी?” आणि “बेकायदेशीर पैसे का घेतले?” असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

व्हिडिओ व्हायरल; आरटीओचे स्पष्टीकरण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर शहर आरटीओ प्रशासनाने स्पष्टीकरण जारी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कर्मचारी नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत कर्तव्य बजावत होते. व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आरोप निराधार असून, चलन प्रक्रियेदरम्यान मुद्दाम चित्रीकरण करून चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

यासंदर्भात कळमना पोलीस ठाणे येथे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची भूमिका काय?
माध्यमांशी बोलताना संबंधित आरटीओ अधिकारी मंगेश राठोड यांनी सांगितले की, “आम्ही नियमित तपासणी करत होतो. एका व्यक्तीने चलन कारवाईदरम्यान आमचे चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. आरोप तथ्यहीन आहेत.

दरम्यान, या प्रकरणामुळे आरटीओ कारवाईची पारदर्शकता आणि अधिकाऱ्यांनी गणवेश परिधान करणे बंधनकारक असण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, सत्य परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement